संस्थेचे उद्दिष्टे

Company about

शैक्षणिक

समाजात शिक्षणापासून वंचित असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील कुटूंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणांचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक मूल्यांनुसार ग्रामीण व शहरी भागातील गरीब व होतकरु मुलां - मुलींना शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येईल व अशा गरीब, होतकरु, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून आर्थिक मदत, शिष्यवृत्ती त्यांना लागणारे शालेय साहित्य वेळोवेळी वाटप करून मोफत संगणकीय प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनविण्यात येईल. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तांत्रिक शिक्षण, इंग्लिश स्कुल त्याच बरोबर अध्यापक महाविद्यालयांची स्थापना करण्यात येईल. त्याचप्रमाणे अकॅडमी, औद्योगिक ( आय. टी. आय. ) व्यावसायिक कोर्सेस चालविण्यात येईल. संस्थेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या शिक्षणामधील शास्त्र, तांत्रिक, कृषी व वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय व्यवस्थापन, परिचारिका आणि प्रसाविका यांची पदवी/ पदविका महाविद्यालये, व्यावसायिक, विधी, कला, अध्यापक, निरनिराळ्या भाषा प्रसार इत्यादी शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यतः समाजातील विविध भागातील अंध, दिव्यांग, विकलांग, मुकबधीर विद्यार्थ्यांना / व्यक्तींना शासनाचे विविध योजना ( प्रकल्प ) त्यांच्या पर्यंत पोहचविण्यात येईल व अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळा व महाविद्यालयांची स्थापना करण्यात येईल.Read More

कार्य

about
नियोजित मार्कंडेय भवन, रायपूर ( छत्तीसगढ ) जमिनीची पाहणी

नियोजित मार्कंडेय भवन, रायपूर ( छत्तीसगढ ) जमिनीची पाहणी

View more

छत्तीसगढ - रायपूर दिनांक 19 ऑगस्ट 2018 रोजी फौंडेशनच्या पदाधिकाऱयांनी नियोजित मार्कंडेय भवन, रायपूर ची जमिनीची पाहणी केली यावेळी छत्तीसगढ अध्यक्ष श्री सुधीरजी बोद्दुन, रायपूर अध्यक्ष गोपाळ परसावार, बल्लेवार, फौंडेशन चे अध्यक्ष प्रवीण कोडम, उपाध्यक्ष डॉ नागेंद्र येंबरवार, डायरेक्टर सुनील अरकल, आकाश माडेवार, महेश जिंदम आदीनी यावेळी पाहणी केली

पद्मशाली अँप्स चे छत्तीसगढ राज्यात उदघाटन संम्पन

पद्मशाली अँप्स चे छत्तीसगढ राज्यात उदघाटन संम्पन

View more

रायपूर - ( छत्तीसगढ ) 19 ऑगस्ट 18 रोजी अध्यक्ष छत्तीसगढ प्रांत पद्मशाली समाज चे माननीय श्री सुधीरजी बोद्दुन यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी रायपूर अध्यक्ष गोपाळ परसावार, साप्ताहिक मनपद्मशाली चे मुख्य संपादक प्रवीण कोडम ( अहमदनगर ) फौंडेशन चे उपाध्यक्ष श्री डॉ नागेंद्र येंबरवार ( मुंबई ), फौंडेशन बॉडी मेंबर श्री सुनील अरकल ( अहमदनगर), आकाश माडेवार ( नागपूर ), पद्मशाली अँप्स चे संथापक महेश जिंदम ( सोलापूर ) यांच्या समवेत रायपूर क्षेत्र पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते

भिलाई पद्मशाली समाज बांधवांना मेळाव्याचे निमंत्रण व चर्चा करताना

भिलाई पद्मशाली समाज बांधवांना मेळाव्याचे निमंत्रण व चर्चा करताना

View more

भिलाई ( छत्तीसगढ ) - 20 ऑगस्ट 18 रोजी भिलाई क्षेत्र पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्री श्रीनिवासजी व समस्त भिलाई समाजास मेळाव्याचे नियंत्रण देण्यात आले व मेळाव्यासंदर्भात चर्चा यावेळी करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भिलाई समाज बांधव या वेळी उपस्थित होते

FOLLOW US

short